नवी मुंबईतील जाहिरात व्यवसायातील ‘रोनक’ची मक्तेदारी संपण्याच्या मार्गावर

नवी मुंबईतील जाहिरात व्यवसायातील ‘रोनक’ची मक्तेदारी संपण्याच्या मार्गावर
Published on

‘रोनक’ची मक्तेदारी संपुष्टात
जाहिरात व्यवसायाबाबत स्थायी समितीत महत्त्वाचा निर्णय
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या जाहिरात फलक कंत्राटाबाबत मंगळवारी (ता. १२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अनेक वर्षांपासून शहरातील जाहिरात व्यवसायावर वर्चस्व राखणाऱ्या ‘रोनक’ कंपनीला केवळ तीन महिन्यांची अंतिम मुदत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरातील जाहिरात क्षेत्रात मोठे बदल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सद्यःस्थितीत शहरातील विविध भागांतील जाहिरात फलकांचे व्यवस्थापन रोनक कंपनीकडे आहे. मात्र, या कंत्राटाच्या मुदतीनंतर नवीन निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. त्यामुळे भविष्यात जाहिरात कंत्राटासाठी खुली स्पर्धा निर्माण होणार असून, अनेक नव्या कंपन्यांना संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या महसूलवाढीच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते, उड्डाणपूल परिसर आणि व्यापारी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिरात फलक लावले जातात. या माध्यमातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एकाच कंपनीकडे कंत्राट असल्यामुळे स्पर्धेचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. स्थायी समितीतील चर्चेदरम्यान काही सदस्यांनी जाहिरात धोरण अधिक पारदर्शक करण्याची मागणी केली.

महसूलवाढीचे उद्दिष्ट
१ नवीन निविदा प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल जाहिरात प्रणाली, महसूलवाढ आणि नियमांचे काटेकोर पालन यावर भर देण्याच्या सूचनाही केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२ नवीन निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जाहिरात क्षेत्रात स्पर्धा वाढून महापालिकेला अधिक महसूल मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
३ शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवर नियंत्रण आणण्यासाठीही प्रशासनाला यामुळे मदत होईल, असे मत व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com