ठाणे जिल्ह्यावर दरडींचे सावट

ठाणे जिल्ह्यावर दरडींचे सावट
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : जिल्ह्याला खाडीकिनाऱ्यासह निसर्गाने नटलेला डोंगररांगांचा परिसर लाभला आहे. वाढत्या नागरीकरणामुळे डोंगर पोखरून गगनचुंबी गृहसंकुले उभारण्यात येत आहेत. त्यामुळे डोंगर खिळखिळा व कमकुवत होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. दरवर्षी पावसाळ्याच्या काळात दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने यंदाच्या माॅन्सूनच्या काळात उद्‍भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेत, ८७ ठिकाणी दरड कोसळणाऱ्या भागांची यादी तयार केली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला शहरीकरणाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. रहिवासी इमारती, उद्योग व्यवसाय, मेट्रो प्रकल्प आदींमुळे जमिनीचा भाव वधारला आहे. शहरात किंवा ग्रामीण भागात मोक्याच्या ठिकाणी सिमेंट क्राँक्रीटची जंगले वाढत असताना निसर्गाांच्या कोप होत आहे. अशातच डोंगररांगांवरदेखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात येत आहे. परिणामी डोंगरावरील माती कमकुवत होऊन पावसाळ्याच्या काळात भूस्खलन होऊन दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. त्यातच ठाणे जिल्ह्यातील डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांवर मात्र, दरडींचा भीतीचे सवत घोंगावत आहे. तसेच यापूर्वीदेखील शहरी व ग्रामीण भागातील डोंगरमाथ्यावर पावसाळ्याच्या काळात दरड कोसळून दुर्घटना घडल्या असून, अनेकांचा बळीदेखील गेला आहे. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असू,न उपाययोजनादेखील करण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सहा महापालिकांसह नगरपालिका आणि ग्रामीण भागातील ८७ ठिकाणी दरड कोसळणाऱ्या भागांची यादी तयार केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक ५१ दरड प्रवण ठिकाणे असून, त्याखालोखाल सहा महापालिका अंतर्गत ३२ दरडप्रवण क्षेत्रे असून, नगर परिषद क्षेत्रातदेखील चार ठिकाणे दरड प्रवण क्षेत्र असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

परिसरानुसार दरडप्रवण क्षेत्रे
तालुका ५१
महापालिका ३२
नगर परिषद ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com