

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर अन्य १४ कंपन्यांचे पाणी
पुरवठा वाढविण्यासाठी निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : उन्हाळ्यात वाढलेल्या उकाड्यामुळे रेल्वे प्रवाशांकडून पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही वाढती गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, स्थानकांवर ‘रेल नीर’सह १४ मान्यताप्राप्त खासगी कंपन्यांच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीला परवानगी दिली आहे.
मध्य रेल्वेवर दररोज लाखो प्रवासी उपनगरीय तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करतात. उन्हाळ्यात तापमानात वाढ झाल्याने थंड पाण्याच्या बाटल्यांची मागणी लक्षणीय वाढते; मात्र आयआरसीटीसीच्या अंबरनाथ येथील ‘रेल नीर’ प्रकल्पातून होणारा पुरवठा अनेकदा अपुरा पडतो. परिणामी, काही स्थानकांवर पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा जाणवतो. ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून १४ कंपन्यांना अधिकृत मान्यता दिली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले, की केवळ मान्यताप्राप्त कंपन्यांच्या बाटल्यांचीच विक्री केली जाईल.
...
मान्यताप्राप्त कंपन्या
ऑक्सीमोअर ॲक्वा, रोकोको, एल्विश, आयोनिटा, इनव्होलाइफ, कन्हैया, ऑक्सीग्रँड, ऑक्सीराइज, ब्रायोटिन, व्हेनिस ब्ल्यू, केल्विनो, विघ्नहर्ता आरोग्यम, सनरिच ॲक्वा आणि ऑक्सीब्ल्यू या कंपन्यांना विविध कालावधीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.