पोस्टमनसाठी ‘आरोग्यदूत’ मोहीम

पोस्टमनसाठी ‘आरोग्यदूत’ मोहीम
Published on

प्रभादेवी, ता. १४ (वार्ताहर) : आपल्या समाजातील संवाद व्यवस्थेचा कणा म्हणजे पोस्टमन. कोणत्याही हवामानात, पाऊस असो वा उन्हाळ्याची तीव्रता, ते अखंडपणे सेवा देत आपल्याला जोडून ठेवतात. त्यांच्या या समर्पणाचा सन्मान करण्यासाठी ‘एचव्हीएस हॉस्पिटल’ने सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेत त्यांच्याकरिता आरोग्यदूत मोहीम राबविली.

‘समर हेल्थ इनिशिएटिव्ह’ या मोहिमेंतर्गत दादर पोस्टल विभागातील मेहनती पोस्टमन बांधवांना उष्णतेच्या तीव्र काळात सुरक्षित व हायड्रेटेड ठेवण्यासाठी विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. यात १०० हून अधिक प्रीमियम वॉटर बॉटल्स, संरक्षणात्मक कॅप्स, फर्स्ट एड किट्स आणि ओआरएस यांचा समावेश होता.

या उपक्रमाचे दादर पोस्टल विभागाच्या प्रमुखांकडून विशेष कौतुक करण्यात आले. त्यांनी पोस्ट विभागातील फील्ड रनर्ससाठी घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले आणि समाजातील या महत्त्वपूर्ण घटकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबद्दल एचव्हीएस हॉस्पिटलचे अभिनंदन केले. हा उपक्रम हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षद सागर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एचव्हीएस सिम्बायोसिस हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

शहरातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, एचव्हीएस हॉस्पिटलने ‘हेल्थकेअरच्या पलीकडे जाऊन समाजासाठी सेवा’ या ध्येयाने ही मोहीम सुरू केली आहे. उन्हामुळे अनेकदा डिहायड्रेशन, हीट एक्सॉशन, हीट स्ट्रोक होऊन ते पुढे हृदयविकाराच्या समस्येत परिवर्तित होऊ शकतात. या धोक्याची जाणीव करून देत एचव्हीएस हॉस्पिटलने समुदायाच्या आरोग्याबाबत आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

आपले टपाल कर्मचारी हे संवाद व्यवस्थेचे कणा आहेत. कठीण परिस्थितीतही ते अखंड सेवा देतात. ही मोहीम त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि त्यांच्या समर्पणाचा सन्मान करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
- डॉ. हर्षद सागर, हृदयरोगतज्ज्ञ, एचव्हीएस हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com