

पदपथावर जलवाहिन्यांचा अडथळा
पादचारी त्रस्त
जोगेश्वरी, ता. १४ (बातमीदार) : अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या मोठ्या जलवाहिन्यांचा साठा फुटपाथवरच पडून असल्याने येथून चालताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पदपथावर फक्त या जलवाहिन्यांचाच अडथळा नसून काही ठिकाणी भूमिगत गटारांची झाकणेही उघड्या अवस्थेत आहेत. या पदपथाचा वापर ज्येष्ठ नागरिकही करतात. तसेच पुढील महिन्यात शाळाही सुरू होणार असून, विद्यार्थीही या पदपथाचा वापर करतील. महत्त्वाचे म्हणजे हा रस्ते गुरुनानक विद्यालय तसेच मेघवाडी पोलिस ठाण्यालाही जातो. अशात पदपथावरील या अडथळ्यांबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही त्याबाबत कोणताच ठोस निर्णय घेण्यात न आल्याने नागरिक त्रस्त आहेत.
स्थानिकांच्या मते, जलवाहिन्याचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप शिल्लक राहिलेल्या जलवाहिन्या पदपथावरून हटवण्यात आलेल्या नाहीत. स्थानिकांना हे पदपथ मोकळे हवे असून, त्यांनी गटारांवरील झाकणांच्या डागडुजीचीही मागणी केली आहे. यासंदर्भात पालिकेच्या ‘के’ पूर्व विभागातील अधिकाऱ्यांनी या समस्यांकडे लक्ष देत तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.