प्रथम संदर्भ रुग्णालयाशेजारी अवैध पार्किंगचा विळखा

प्रथम संदर्भ रुग्णालयाशेजारी अवैध पार्किंगचा विळखा
Published on

पालिका रुग्णालयाला अवैध पार्किंगचा विळखा
आपत्कालीन सेवांना अडथळा; रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : वाशी सेक्टर-१० येथील प्रथम संदर्भ रुग्णालय परिसरात अवैध वाहन पार्किंग वाढत आहे. यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. रुग्णालयाच्या शेजारील मोकळ्या जागेवर बेकायदा वाहनतळ उभे राहिल्याने आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होत असून, सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
पालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय दररोज शेकडो रुग्णांनी गजबजलेले असते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयाशेजारील परिसरातील मोकळ्या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून अनधिकृतपणे चारचाकी, रिक्षा आणि बेवारस वाहने उभी केली जात आहेत. परिणामी, रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा आणि रुग्णांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी या परिसरात उभ्या असलेल्या काही रिक्षांमध्ये मद्यपानाचे प्रकार सुरू असतात. तसेच, काही संशयास्पद हालचाली आणि गैरप्रकार घडत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचे वातावरण निर्माण होत असल्याने महिला रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अस्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न
विशेष म्हणजे रुग्णालयाच्या आवारालगत मोठ्या प्रमाणात उभ्या असलेल्या वाहनांमुळे परिसरात अस्वच्छता वाढत असून, रात्रीच्या वेळी अंधार आणि गर्दीमुळे सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. नागरिकांनी रुग्णालय परिसरातील अवैध पार्किंग तत्काळ हटवून येथे नियमित सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही निरीक्षण आणि वाहन नियंत्रणाची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रुग्णालय परिसर हा रुग्णांच्या उपचारासाठी सुरक्षित आणि सुलभ राहावा, यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडून त्वरित अशा वाहनांवर कारवाई करावी. पालिका स्वच्छ भारत अभियानात बेवारस व भंगार वाहनावर कारवाई करते मग ही वाहने का हटवली जात नाहीत.
- गोविंद साळुंखे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com