तळोजा कारागृहातील कैद्यांना स्वयंरोजगार प्रशिक्षण

तळोजा कारागृहातील कैद्यांना स्वयंरोजगार प्रशिक्षण
Published on

तळोजा कारागृहातील कैद्यांना स्वयंरोजगार प्रशिक्षण
श्रीवर्धन, ता. १४ (वार्ताहर) : कारागृहातील कैद्यांना नैराश्याचा सामना करावा लागू नये व कारागृहात दाखल झाल्यावर त्याचे समाजाशी असलेले नाते संपुष्टात येऊ नये, याकरिता शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. कैद्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना रोजगार करता यावा, यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात स्वयंरोजगार प्रशिक्षण घेण्यात आले.
हे प्रशिक्षण बुधवारी (ता. १३) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, कोकण भवन, नवी मुंबई यांचे मार्फत घेण्यात आले. तळोजा कारागृहात टू व्हीलर मेकॅनिक, बागकाम व नर्सरी यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेऊन कैद्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये ३०-३० विद्यार्थांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण केले.
सदरच्या प्रशिक्षणच्या पूर्ततेनंतर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, महाराष्ट्र राज्य आयुक्त अमित सैनी यांच्या यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमास कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, सचिन जाधव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कोकण विभाग उप आयुक्त अमिता पवार , कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कोकण विभाग, ग्रामीण प्रगती फाऊंडेशनचे प्रमुख मंगेश डफळे व कारागृह उपअधीक्षक जितेंद्र काळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी राहुल झुटाळे, सचिन झिंजुर्डे व बंद्याचे कारागृहातील सहाय्यक प्रशिक्षक सुनिल वाघचौरे आणि हवालदार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com