वाहतूक वॉर्डन, सुरक्षा जवानांना वर्षभराची मुदतवाढ

वाहतूक वॉर्डन, सुरक्षा जवानांना वर्षभराची मुदतवाढ
Published on

उल्हासनगर, ता. १४ (बातमीदार) : महापालिकेच्या वतीने वाहतूक पोलिस शाखेत नियुक्त केलेल्या वाहतूक वॉर्डन; तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कार्यरत असलेल्या सुरक्षा जवानांना पुढील एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती स्थायी समिती सभापती कलवंतसिंह (बिट्टू) सहोता यांनी दिली.

महापालिका क्षेत्रात बाह्य स्रोतांद्वारे नियुक्त केलेले दोन शस्त्रधारी आणि ५० निशस्त्रधारी अशा एकूण ५२ सुरक्षा जवानांचा या मुदतवाढीत समावेश आहे. तसेच ट्रॅफिक वॉर्डन यांना मुदतवाढीसोबत अर्थसहाय्य निधीलाही मंजुरी दिल्याचे सहोता यांनी स्पष्ट केले. याशिवाय उद्यानांमध्ये कामकाजासाठी वर्ग-४ संवर्गातील माळी व मजूर पदावरील कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यासही मान्यता दिली आहे. मूलभूत सोयी-सुविधा विकास योजनेंतर्गत शिवसेना नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर महाराज यांच्या प्रभागातील दोन विकासकामांनाही स्थायी समितीने मंजुरी दिली.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. धिरज चव्हाण, मुख्यालय उपायुक्त डॉ. दीपाली चौगले, सचिव अनंत जवादवार, उपायुक्त विशाखा मोटघरे, स्नेहा करपे, मुख्यलेखा अधिकारी किरण भिलारे, मुख्यलेखा परीक्षक सुषमा पाटील तसेच स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com