स्व-गणना सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्व-गणना सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
Published on

स्व-गणना सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) : भारताची जनगणना-२०२७ ही प्रथमच डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून, नागरिकांसाठी स्व-गणना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी यांनी केले आहे.
भारत सरकारच्या जनगणना संचालनालयामार्फत जनगणना-२०२७ अंतर्गत घरगुती व घरगणना टप्प्याचे क्षेत्रीय कार्य १६ मे ते १४ जून या कालावधीत पार पडणार आहे. नागरिकांना https://se-census-gov-in या संकेतस्थळावर जाऊन स्व-गणना करता येणार आहे. स्व-गणना प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याने सर्व शासकीय कार्यालये तसेच अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांनी या मोहिमेचा प्रसार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना स्व-गणनेबाबत मार्गदर्शन करावे तसेच कार्यालयीन संकेतस्थळ, समाजमाध्यमे, व्हॉट्सॲप समूह आदी माध्यमांतून जनजागृती करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com