नंदकुमार पारावे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

नंदकुमार पारावे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
Published on

नंदकुमार पारावे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
माणगाव, ता. १४ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील चिंचवळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नंदकुमार पारावे यांना विवा कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित माणगाव यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे.
नंदकुमार पारावे यांनी सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. गावातील विविध विकासकामांना गती देत ग्रामस्थांचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. तसेच सामाजिक बांधिलकी जपत युवकांना प्रोत्साहन, महिला बचत गटांना सहकार्य आणि ग्रामविकासाच्या विविध योजनांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेत विवा कॉलेज एज्युकेशन सोसायटी माणगाव यांच्या वतीने त्यांची राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com