गोरेगाव येथे रक्तदान शिबिर

गोरेगाव येथे रक्तदान शिबिर
Published on

गोरेगाव येथे रक्तदान शिबिर
माणगाव, ता. १४ (वार्ताहर) : गोरेगाव येथे गुरुवारी (ता. १४) ‘रवी दर्शन’ या नवीन सभागृहात परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त तसेच द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ४५व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिरात ३० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे महिला रक्तदात्यांनीही मोठ्या उत्साहाने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली. संपूर्ण शिबिरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमादरम्यान गोरेगाव परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. गोरेगाव आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने रक्तदाते, मान्यवर तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com