महिन्याभरात दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त

महिन्याभरात दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त
Published on

अमली पदार्थ तस्करांची धरपकड
महिन्याभरात दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत महिन्याभरात एक कोटी ९० लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात ४९ जणांना अटक करण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार शहरात अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन परिमंडळाच्या कार्यक्षेत्रात महिनाभर विशेष मोहीम राबवण्यात आली. या वेळी पथकाने केलेल्या कारवाईत ४० लाख १९ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने स्वतंत्रपणे केलेल्या कारवाईत नऊ लाख ३२ हजारांचे अमली पदार्थ जप्त करून १४ पुरुष व एका महिलेला अटक केली आहे. तर दोन परदेशी व्यक्तींचा समावेश आहे. शिवाय, अमली पदार्थ सेवन करणाऱ्या ४२२ गुन्हे दाखल केले आहेत. तर गांजा सेवन करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
-----------------------------
विभाग कालावधी जप्त मुद्देमाल
परिमंडळ १ २० ते २६ एप्रिल १ कोटी १० लाख
परिमंडळ २ २८ ते ४ मे २४ लाख १७ हजार
परिमंडळ ३ ६ ते १२ मे ५ लाख ६६ हजार
दाखल गुन्हे ३४ गुन्हे अटक आरोपी २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com