वसई विरार शहर कचरामुक्त व पर्यावरणाचा ध्यास

वसई विरार शहर कचरामुक्त व पर्यावरणाचा ध्यास
Published on

पर्यावरण रक्षणाचा संकल्प
वसई-विरार पालिकेकडून कचरामुक्तीसाठी प्रयत्न
वसई, ता. १४ (बातमीदार)ः वसई-विरार शहरात दररोज निर्माण होणाऱ्या ओला, सुका कचरा प्रक्रिया तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच अनुषंगाने शहरात वृक्षलागवडीबरोबर पर्यावरण संर्वधनसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
वसई-विरार शहरात दैनंदिन ७०० टनपेक्षा अधिक कचरा जमा केला जातो. रहिवासी, औद्योगिक, सार्वजनिक ठिकाणचा ओला आणि सुका कचऱ्याचा समावेश आहे. या कचऱ्याची क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त पद्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया केली जाते. मात्र, ही प्रक्रिया अधिक क्षमतेने काम करण्यासाठी पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने पीपीपी तत्त्वावर शहरातील उद्यानाकरिता आरक्षित भूखंड, मोकळ्या जागा तसेच गुरचरण जागेवर मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड तसेच दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडांची लागवड केली जात आहे. त्यामुळे एकीकडे प्रदूषणात होत असलेली वाढ नियंत्रणात आणताना पालिकेकडून पर्यावरण समतोल राखता यावा यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.
-----------------
प्रशासकीय मंजुरीसाठी हालचाली
- वसई-विरार शहर पालिकेला कचरामुक्त शहर तीन तारांकित मानांकन प्रमाणिकरण स्वयंघोषित करण्यासाठी अंतिम प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. त्यामुळे वसई-विरार शहराला स्वच्छतेची वाट सापडणार आहे.
- वसई पूर्व भोईदापाडा, गोखिवरे येथील क्षेपणभूमीवर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे. त्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या प्रशासकीय मंजुरी मिळण्याकरिता विषय मांडण्यात आला आहे.
-----------
वसई-विरार शहरात स्वच्छता राखता यावी तसेच क्षेपणभूमीवरील कचरा प्रक्रिया करण्यावर भर दिला जाणार आहे. याच अनुषंगाने शहरात वृक्षलागवड संवर्धन मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
-अजीव पाटील, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com