जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘शाळा पूर्व तयारी मेळावे’;

जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘शाळा पूर्व तयारी मेळावे’;
Published on

शाळा प्रवेशासाठी २६ हजार मुले सज्ज
पालघर जिल्ह्यातील २,११२ ठिकाणी पूर्वतयारी मेळावे
मनोर, ता. १४ ः पालघर जिल्ह्यातील २,११२ जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘शाळा पूर्वतयारी मेळावे’ घेण्यात आले होते. या माध्यमातून जवळपास २६ हजार मुले पहिलीतील प्रवेशासाठी मानसिकदृष्टीने सज्ज झाली आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध अंगणवाडी केंद्रांतील बालकांनी सहभाग नोंदवला. शाळा प्रवेशासाठी पात्र बालकांसाठी विविध उपयुक्त स्टॉल उभारण्यात आले होते. नोंदणी स्टॉलवर बालकांचे नावनोंदणी करून त्यांचे वजन व उंची मोजण्यात आली. तसेच विकासपत्र देण्यात आले. शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास आणि गणनपूर्व तयारीतून मुलांकडून प्रत्यक्ष कृती करण्यात आली. या वेळी मातांना घरच्या घरी मुलांच्या बौद्धिक, भावनिक विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शाळापूर्व तयारीसाठी कार्यपुस्तिकांचेही वितरण करण्यात आले.
------------------------
पालघर जिल्ह्यात शाळेत दाखल पात्र विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील टप्प्यात १५ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जाणार असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
- सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद पालघर
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
मेळाव्याची ठळक आकडेवारी
जिल्हा परिषद शाळा : २,११२
दाखल पात्र विद्यार्थी : २६,८५३
माता : १९,४०४
पुरुष पालक : १०,९६३
ग्रामस्थ : १७,५८२
मुख्याध्यापक व शिक्षक : ६,६१०
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य : १०,४१७
माजी विद्यार्थी : ९,९२९
स्वयंसेवक : ५,५४७
अधिकारी, कर्मचारी व अंगणवाडी सेविका : २,१०७

Marathi News Esakal
www.esakal.com