सुरू असलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करा

सुरू असलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करा
Published on

विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करा!
पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांचे आदेश

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) ः मिरा-भाईंदर शहारात सुरू असलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी प्रशासनाला दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन तसेच विकासकामांचा पावसाळापूर्व आढावा घेण्यासाठी आयुक्तांनी बैठक घेतली होती.
विकासकामे पूर्ण करताना कामांची गुणवत्ता अबाधित ठेवण्यावर विशेषतः रस्ते खड्डेमुक्त ठेवण्यावर भर देण्यात यावा, गटार झाकणांची तातडीने दुरुस्ती करावी, सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या भोवती संरक्षक जाळ्या बसवणे, विजेच्या खांबांची तपासणी करून त्यांना सुरक्षित करणे आदी सूचना आयुक्तांनी दिल्या. पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने आयुक्तांनी शहरातील धोकादायक इमारतींची प्राथमिक यादी तयार करून त्यांचे अतिधोकादायक, धोकादायक व संभाव्य धोकादायक अशा तीन गटांत वर्गीकरण करावे, या यादीनुसार धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यासाठी तातडीने कार्यवाही राबवावी, त्यासाठी संबंधितांना नोटीस देणे, घरमालक व रहिवाशांशी समन्वय साधणे आणि त्यांना निवारास्थळी स्थलांतर करण्याबाबत सुविधा पुरवण्याचे आदेश त्यांनी दिले.
-----------------------------
बैठकीतील प्रमुख मुद्दे
- खोदकामांसाठी १५ मेनंतर बंदी
- तातडीने रस्तेदुरुस्ती करा
- महामार्गालगत राडारोडा टाकण्यास मनाई
- डेब्रिज टाकणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई
- मुबलक औषधसाठा उपलब्ध करा
- आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा सज्ज ठेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com