किरकोळ कारणावरुन वाशीत भररस्त्यात सत्तूरने प्राणघातक हल्ला

किरकोळ कारणावरुन वाशीत भररस्त्यात सत्तूरने प्राणघातक हल्ला
Published on

किरकोळ कारणावरून भररस्त्यात एकावर हल्ला
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांसह भररस्त्यात एकावर प्राणघातक हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात दोन तरुणांसह एका चायनीज स्टॉलचा आचारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर हल्लेखोर टोळी फरार झाली असून, वाशी पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
ओमकार मेटकर व प्रणव खाबडे हे त्यांच्या इतर मित्रांसह मंगळवारी (ता. १२) रात्री वाशी सेक्टर-३ परिसरात वॉकिंग करण्यासाठी बाहेर पडले होते. या वेळी ते भाजी मार्केटसमोरून जात असताना देवा सिंग याने कट मारल्याच्या कारणावरून प्रणव व ओमकार यांच्यासोबत वाद घातला. यामध्ये देवा सिंग याने ओमकारच्या डोक्यात सत्तूरने वार करून गंभीर जखमी केले, तर या वेळी ओमकारला वाचवण्यासाठी प्रणव आणि चायनीज स्टॉलचा आचारी यांनी मध्यस्थी केली असता देवा सिंग आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावरदेखील लोखंडी रॉडने हल्ला चढविला. त्यानंतर सर्व आरोपींनी पलायन केले. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी आरोपी देवा सिंग यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, देवा सिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाशी आणि कोपरखैरणे पोलिस ठाण्यात यापूर्वीही अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com