अलिबाग मच्छीमार जेट्टी परिसरात पोलिसांचे मॉक ड्रिल

अलिबाग मच्छीमार जेट्टी परिसरात पोलिसांचे मॉक ड्रिल
Published on

अलिबाग मच्छीमार जेट्टी परिसरात पोलिसांचे मॉक ड्रिल
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) : अलिबाग मच्छीमार जेट्टी परिसरात प्रोबेशनरी डीवायएसपी योगिता कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. १३) सुरक्षा मॉक ड्रिल पार पडले.
या मॉक ड्रिल अंतर्गत, मच्छीमार जेट्टी परिसरात संशयास्पद बोट आल्याची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जेट्टी परिसरातील बोटींची सखोल तपासणी सुरू केल्याने परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. संपूर्ण जेट्टी परिसराची नाकाबंदी करून तेथील बोटींची तपासणी करण्यात आली. काही बोटींची प्रत्यक्ष झडती घेऊन संशयास्पद वस्तु, स्फोटके किंवा घातपाताशी संबंधित बाबींची पडताळणी करण्यात आली. तसेच समुद्रमार्गे होणाऱ्या संभाव्य घुसखोरी, तस्करी किंवा दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा यंत्रणांची सज्जता तपासली.
या मॉक ड्रिलच्या माध्यमातून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडल्यास विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय कसा साधायचा, तात्काळ प्रतिसाद कसा द्यायचा आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता येतील, याचे प्रशिक्षण देण्यात आले.
अलिबाग पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० पोलिस कर्मचारी, एटीबी शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र जाधव व त्यांच्यासोबत दोन अंमलदार, क्यूआरटी टीमचे २० जवान, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) तसेच डॉग स्कॉड यांनी या मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com