

विरार, ता. १४ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात अमृत २.० जल योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणी पाइपलाइन टाकण्यासाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यात मातीचा भराव टाकला असून, खडीकरण व डांबरीकरणाचे काम अनेक महिने होऊन गेले तरी पूर्ण करण्यात आलेले नाही.
त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना अडथळा निर्माण होत आहे. महिनाभरातच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण परिसरात चिखल होऊन मोठी वाहने त्यात अडकून वाहतूक कोंडी होऊ शकेल. नागरिकांना येथून चालणेही कठीण होईल. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून काँग्रेसचे वसई विरार शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुलदीप दिनेश वर्तक यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत सेवा दलचे रतन तिवारी, प्रदेश सरचिटणीस दिनेश कांबळे हे पदाधिकारी उपस्थित होते. पावसाळादरम्यान नागरिकांना होणाऱ्या त्रासाची शक्यता लक्षात घेऊन कुलदीप वर्तक यांनी महापालिकेचे महापौर अजीव पाटील आणि आयुक्त पृथ्वीराज बी. व्ही. यांना दिनांक काल याबाबत पत्र पाठवून त्या रस्त्यावरील पाणीपुरवठ्यासाठी खोदकाम करण्यात आलेले खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीस पूर्ववत करून देण्याचे आदेश देण्याबाबत कळविले असून, महापालिका हद्दीतील उघडी गटारे, मॅन होल, पावसाळ्यापूर्वी बंदिस्त करण्याचेही आदेश देण्याची विनंती करून त्वरित कार्यवाही व्हावी, असे पत्राद्यारे कळवून यापूर्वी उघड्या गटारांमुळे, मॅन होलमुळे जीवितहानी झाल्याची आठवण करून दिली आणि या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गटारे पावसाळ्यापूर्वी बंदिस्त करून घेण्याची विनंती केली आहे. याबाबतीत हयगय होऊन जीवितहानी झाल्यास त्यास वसई-विरार महापालिका आयुक्त जबाबदार असतील, असे सांगून खबरदारीच्या दृष्टीने ही कार्यवाहीदेखील त्वरित होण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.