मुंबईत दिव्यांग आणि निराधार मुलांचे काष्ठशिल्प प्रदर्शन

मुंबईत दिव्यांग आणि निराधार मुलांचे काष्ठशिल्प प्रदर्शन
Published on

मुंबईत दिव्यांग आणि निराधार मुलांचे काष्ठशिल्प प्रदर्शन
पहिल्यांदाच मुंबईकरांना प्रदर्शना पाहण्याची संधी

मुंबई, ता. १४ : दिव्यांग, मूकबधिर आणि निराधार मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत उभारण्याच्या उद्देशाने मुंबईत पहिल्यांदाच या मुलांनी तयार केलेल्या काष्ठशिल्पांचे प्रदर्शन (लाकूडकला प्रदर्शन) भरवले जात आहे. पु. ल. अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या आवारात हे प्रदर्शन शुक्रवार (ता. १५) ते गुरुवार (ता. २१) या कालावधीत भरवले जाणार आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम आणि सौरभ कटियार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे, अशी माहिती गुरुवारी (ता. १४) आयोजक डॉ. पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी दिली.

या प्रदर्शनाचा उपक्रम मुंबई मराठी पत्रकार संघ आणि स्व. अंबादापत वैद्य मतिमंद, मूकबधिर व लावारिस बालगृह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात असून, यातून मानवता आणि करुणेच्या भावनेतून प्रेरित होऊन आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात गोपाल एज्युकेशनल सोसायटीद्वारे संचालित स्व. अंबादापत वैद्य मानसिकदृष्ट्या विकलांग, कर्णबधिर आणि अपंग बालगृहातील मुलांनी तयार केलेल्या आकर्षक लाकडी कलाकृती मांडण्यात येणार आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या मुलांनी आपल्या मेहनत, सर्जनशीलता आणि जिद्दीच्या बळावर विविध काष्टशिल्प आणि कलात्मक वस्तू तयार केल्या आहेत. प्रदर्शनातील सर्व कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध असणार असून, त्यातून मिळणारा संपूर्ण निधी मुलांच्या निवास, अन्न, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या वेळी बोलताना डॉ. शंकरबाबा पापळकर म्हणाले, समाजातील प्रत्येकाने या सेवाभावी उपक्रमाला सहकार्य करून दिव्यांग आणि निराधार मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करावा. आपल्या उपस्थितीमुळे आणि पाठिंब्यामुळे या मुलांना आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल.
तसेच, बेवारस दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी सरकारने आयुष्यभर संरक्षण देणारा विशेष कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com