पाणी कपातीमुळे नवी मुंबईकर बेहाल

पाणी कपातीमुळे नवी मुंबईकर बेहाल
Published on

पाणीकपातीमुळे नवी मुंबईकर बेहाल
पाण्याचा बाटला, जार खरेदीकडे नागरिकांचा कल
बेलापूर, ता. १४ (बातमीदार) ः स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत सध्या पाणीकपातीचे भीषण संकट उभे राहिले आहे. कडाक्याच्या उन्हात मोरबे धरणातील घटता पाणीसाठा आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे होणाऱ्या पाणीकपातीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, पाण्यासाठी टँकर, बाटल्या आणि जारवर अवलंबून राहण्याची वेळ शहरात आली आहे. पाणीकपातीमुळे नागरिक बेहाल झाल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. पाणीकपातीमुळे नागरिक बेहाल झाल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.
नवी मुंबई शहरातील बेलापूर, सीवूड्स, नेरूळ, वाशी, दिघा, ऐरोली, रबाळे, घणसोली, गोठीवली, कोपरखैरणे, महापे, पावणे, तुर्भे यांसह अन्य भागांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. काही भागांमध्ये सकाळी १० वाजेपर्यंत दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले असून, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण घरात पाण्याचा साठा करण्यासाठी धावपळ करत आहेत.

शुद्ध पाण्यासाठी पाण्याचा बाटला, जार खरेदीकडे कल
शहरात ठिकठिकाणी पाणीटंचाई आहे. सकाळ आणि सायंकाळी काही वेळासाठी पाणी येते. मात्र, ते पाणी गढूळ येत असल्याने नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहेत. परिणामी, शुद्ध पाणी आणि सुरक्षेसाठी नागरिक पाण्याचा बाटला, जार खरेदीला प्राधान्य देत आहेत.

२४ तास पाणी असणाऱ्या सोसायट्यांमध्ये टँकर
२४ तास पाणी उपलब्ध असण्याची सवय शहरातील बहुतांश सोसायट्यांना आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात असणाऱ्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना चक्क टँकर सोसायट्यांमध्ये बोलवावे लागत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com