सराईत चोरट्या बहिणींच्या हातात बेड्या

सराईत चोरट्या बहिणींच्या हातात बेड्या
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : बस प्रवासादरम्यान, तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत बहिणींना ठाणे गुन्हे शाखा घटक एकने अटक केली, तर त्याच्या फरार साथीदार महिलेचा शोध सुरू आहे. अटक बहिणींच्या ताब्यातून तब्बल ३७ लाख १९ हजारांचे २५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. तसेच त्या दोघींनी चोरीच्या नऊ गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली.

कळवा, पारसिकनगर येथील अंजनी दत्तात्रेय सूर्यवंशी (वय ७२) या खारेगाव नाका ते ओझोन व्हॅली बसस्टॉपदरम्यान बसने प्रवास करीत होत्या. त्या वेळी त्यांच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या तीन महिलांनी त्यांच्या पिशवीतील १२ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरी केली. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ठाणे शहर परिमंडळ एकमध्ये अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या गुन्ह्यांचा समांतर तपास ठाणे गुन्हे शाखेकडे सोपवला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मूळ सोलापूर आणि सध्या मुलुंड येथील संगीता दशरथ पीठकर (वय ४५) आणि सुरेखा बजरंग गायकवाड (४७) या दोघींना सापळा रचून ताब्यात घेत, त्यांना ७ मे रोजी अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड आणि पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ यांच्या तपासात त्या बहिणींनी मागील दोन वर्षांत कळवा, राबोडी, ठाणेनगर आणि नौपाडा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अशाच प्रकारचे एकूण नऊ गुन्हे केल्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com