

सेंट्रल पार्क भूखंडाला डेब्रिजचे स्वरूप
सिडकोचे दुर्लक्ष नागरिकांमध्ये नाराजी
खारघर, ता. १४ (बातमीदार) : सिडकोच्या सेंट्रल पार्क भाग २ परिसरातील राखीव भूखंडावर भूमाफियांकडून डेब्रिज टाकण्याचा सपाटा लावल्याने सदर भूखंडाला डेब्रिजचे स्वरूप आले आहे. सिडकोकडून दुर्लक्ष केला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या भूखंडावर रात्री डम्परच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांधकामातील मलबा, सिमेंटचे तुकडे, माती व इतर कचरा आणून टाकला जात आहे. सदर भूखंड डेब्रिजमय झाला असून, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, सिडकोच्या या राखीव भूखंडांचा वापर भविष्यात सार्वजनिक सुविधा, उद्यान किंवा इतर विकासकामांसाठी होणार होता. मात्र, काही भूमाफियांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत या जागांवर अनधिकृतपणे डेब्रिज टाकण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे प्रकार बहुतांश रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास होत असल्याने संबंधितांवर कारवाई करणे कठीण जात आहे.
चौकट
कारवाई व्हावी
डेब्रिज टाकल्यामुळे रस्त्यांवर धुळीचे प्रमाण वाढले असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा जवळ येत असताना हे डेब्रिज नाल्यांमध्ये वाहून जाऊन पाणी तुंबण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि डेब्रिज टाकणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात सिडकोचे दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.