

मृत बिनू कुमारणच्या कुटुंबीयांना शासनाची आर्थिक मदत
शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नांना यश
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) : गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान चांदिवली खैरानी रोड येथे ओव्हरहेड वायरचा शॉक लागून बिनू कुमारणचा अपघाती मृत्यू झाला होता. कुटुंबातील कमावता व्यक्ती गेल्यामुळे कुमारण कुटुंबीय निराधार झाले होते. अशात स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या अथक प्रयत्नांतून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बिनूच्या कुटुंबीयाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून एक लाख रुपये मदत मंजूर करून घेतली आहे.
गुरुवारी (ता. १४) आमदार लांडे यांच्या हस्ते आणि कुर्ला तालुका तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मृत बिनूच्या कुटुंबाला हा धनादेश देण्यात आला. कुर्ला पश्चिम काजूपाडा शिवाजी मैदान येथील संदेश भवन येथे आमदार दिलीप लांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा धनादेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मृत बिनू कुमारणचे कुटुंबीय भावुक झाले होते. यादरम्यान आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले की, गणेश विसर्जनदरम्यान चांदिवलीतील एका गणेशभक्ताचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात निराधार झालेल्या आईला शासनाची आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न झाले. गुरुवारी शासनाचा धनादेश देण्यात आला असला तरी त्या माउलीला कायमस्वरूपी शासनाची आर्थिक मदत मिळावी म्हणून मी आणि तहसीलदार प्रयत्न करीत असून, पुढच्या महिन्यापासून आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती लांडे यांनी या वेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.