

वसई किल्ल्यात
तरुणीवर हल्ला
संशयास्पद मैत्रीवरून चाकूने वार
नालासोपारा, ता. १४ (बातमीदार) : आपल्यासोबत मैत्री असताना आणखी एका मित्रासोबत मैत्री वाढवत असल्याच्या संशयावरून मैत्रिणीला वसई किल्ल्यात बोलावून तिच्यावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता. १४) घडली. या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संचित डॉमाणिक बला (वय २३) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संचित वसईच्या पाचूबंदर येथील रहिवासी असून, याचे २१ वर्षीय तरुणीसोबत काही महिन्यांपासून मैत्रीचे संबंध होते, पण तरुणी दुसऱ्या मित्रासोबतही मैत्रीचे संबंध वाढवत असल्याचा आरोपीला संशय आला. याच रागातून आरोपीने मैत्रिणीला बुधवारी (ता. १३) वसई किल्ल्यात भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी या दोघात संशयावरून वाद झाला आणि त्याच रागातून आरोपीने त्याच्याकडील धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. या हल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला वसई पोलिसांनी अटक केली असून, शुक्रवारी (ता. १४) त्याला वसई न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.