इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे

इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे
Published on

इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे
पेट्रोल-डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : इंधन बचतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी आजपासून पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे.
राज्य शासनाच्या विद्युत वाहन धोरण २०२५ला अनुसरून महावितरणने पेट्रोल व डिझेल वाहनांऐवजी विद्युत वाहनांना प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात महावितरणच्या मुख्य व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी १० विद्युत वाहनांच्या खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. महावितरणअंतर्गत सर्व मुख्य अभियंता तसेच क्षेत्रीय अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागप्रमुख अभियंता यांनाही पेट्रोल किंवा डिझेलऐवजी फक्त विद्युत वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com