‘रॉयल’ची १०० टक्के निकालाची परंपरा

‘रॉयल’ची १०० टक्के निकालाची परंपरा
Published on

कल्याण, ता. १४ (वार्ताहर) : सुदर्शन एज्युकेशन ट्रस्ट, कल्याण (पूर्व) संचलित रॉयल हायस्कूल व रॉयल इंग्लिश हायस्कूल या सेमी इंग्रजी, मराठी व इंग्रजी माध्यमांनी दहावीच्या परीक्षेत सलग १०० टक्के निकालाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी विविध श्रेणीमध्ये यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यावर्षीच्या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमात श्रेयस घुगे याने ९२.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, निखिल डहाळे याने ९२.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, कार्तिक सानप याने ९१.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. तर मराठी माध्यमात पौर्णिमा बांगर हिने ७८.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक व आयुष म्हादये ७६.८० टक्के गुण मिळवून द्वितीय व वृषभ पवार व दिक्षा शिंदे यांनी ७४.४० गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. शाळेच्या १०० टक्के निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. एस. जे. पाटील यांनी संस्थेचे विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com