रोह्यात पेट्रोलचा तुटवडा, ग्रहकांची गैरसोय

रोह्यात पेट्रोलचा तुटवडा, ग्रहकांची गैरसोय
Published on

रोह्यात पेट्रोलचा तुटवडा
ग्राहकांची गैरसोय

रोहा, ता. १४ (बातमीदार) ः रोहा शहर व ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालक- मालकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
इराण-अमेरिका युद्ध पेटल्यानंतर इराण देशातून होणाऱ्या कच्च्या तेलाची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे देशभरात कच्च्या तेलाची टंचाई जाणवत आहे. भारताकडे असलेल्या कच्च्या तेलाचा साठा मर्यादित काळापुरता असल्याने नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलाचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान यांनी केलेल्या आवाहनानंतर देशभरात खळबळ उडाली आणि पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी एकच गर्दी केली. रोहा तालुक्यातील प्रत्येक पेट्रोल पंपवर सलग तीन ते चार दिवस वाहनचालकांनी गर्दी केल्याने पेट्रोल- डिझेलचा असलेला साठा संपल्याने काही पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल पंपचे मुख्य द्वार बंद करून पेट्रोल संपल्याची माहिती दिली. तर काही पेट्रोल पंपांवर थोड्याबहुत प्रमाणात असलेला साठा विक्री होत असल्याने वाहनचालक पंपावर गर्दी केली आहे. त्यात पेट्रोल-डिझेलविषयी समाजमाध्यमांवर मेसेज व्हायरल झाल्याने लोकांनी आपल्या वाहनात पेट्रोलचा साठा उपलब्ध व्हावे म्हणून पंपावर गर्दी केली आहे. शासनाकडून पेट्रोल आणि डिझेल मर्यादित उपलब्ध होत असल्याने अशी परिस्थिती असल्याचे पेट्रोल पंपचालकांकडून सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com