नवी मुंबईत पार्किंग कंत्राटदारांचा उच्छाद

नवी मुंबईत पार्किंग कंत्राटदारांचा उच्छाद
Published on

नवी मुंबईत पार्किंग कंत्राटदारांचा उच्छाद
पे अँड पार्क व्यवस्थेतील गंभीर घोळ उघड
तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पे अँड पार्कच्या नावाखाली सर्वसामान्य वाहनचालकांची उघडपणे आर्थिक लूट सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. पालिकेने निश्चित केलेले अधिकृत दर धाब्यावर बसवून वाशी, बेलापूरसह अनेक ठिकाणी वाहनधारकांकडून सर्रास २० रुपये आकारले जात आहे. यामुळे पालिकेच्या पार्किंग व्यवस्थेतील अनियमितता, महसूल गळती आणि कंत्राटदारांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
वाशी आणि बेलापूर हे नवी मुंबईतील प्रमुख व्यापारी व कार्यालयीन विभाग मानले जातात. दररोज हजारो वाहनांची येथे ये-जा असते. याच गर्दीचा फायदा घेत पार्किंग कंत्राटदारांनी स्वतःचेच ‘दरपत्रक’ लागू केल्याचे दिसून येत आहे. पावतीवर वाहनाचा संपूर्ण क्रमांक नोंदवण्याऐवजी केवळ शेवटचे चार अंक लिहिले जात असल्याने नेमकी किती वाहने उभी राहिली, किती पावत्या फाडल्या गेल्या आणि प्रत्यक्ष महसूल किती जमा झाला, याचा स्पष्ट हिशोब ठेवणे कठीण होत आहे. त्यामुळे महसूल गळतीसोबतच भ्रष्टाचाराची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक पार्किंग ठिकाणी डिजिटल पावती मशीनचा वापरच केला जात नाही. सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने झाले, तर मनपाच्या महसुलात मोठी वाढ होऊ शकते. दरम्यान, यासंदर्भात मालमत्ता विभागाच्या उपायुक्त भागवत डोईफोडे यांनी या प्रकरणाची तत्काळ चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे.

जादा वसुली
१ नियमानुसार दुचाकीसाठी एक रुपया आणि चारचाकीसाठी पाच रुपये प्रतितास असा अधिकृत दर असताना अनेक ठिकाणी २० रुपये पार्किंग असे फलक लावून वाहनधारकांकडून जादा वसुली सुरू आहे.
२ पालिकेचे अधिकृत दरपत्रक नागरिकांच्या नजरेपासून लपवण्यासाठी काही ठिकाणी ते हटवण्यात आले असून, त्याजागी कंत्राटदारांनी स्वतः तयार केलेले फलक उभे केले आहेत.
३ पार्किंग पावतीवर अधिकृत दर छापलेले असतानाही त्यावर जाणीवपूर्वक मोठा शिक्का मारला जात असल्याने वाहनधारकांना मूळ दर समजत नसल्याची तक्रार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com