

भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेच्या पाच प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या असून, काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी दोन समित्यांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला एका समितीवर सभापतिपद मिळवण्यात यश आले आहे.
पालिका मुख्यालयातील सभागृहात गुरुवारी झालेल्या या निवडणूक प्रक्रियेस ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पिठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रभाग समिती क्रमांक १, २ आणि ४ साठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तेथे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये दोन आणि प्रभाग समिती क्रमांक ५ मध्ये तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत प्रभाग समिती क्रमांक ३ मधून शिवसेनेचे संजय भोईर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या रंजिता कोंडा यांचा बिनविरोध विजय झाला. तसेच प्रभाग समिती क्रमांक ५ मधील दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजपचे ॲड. वैभव एकनाथ यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. दरम्यान, प्रभाग समिती सभापतिपदांच्या निवडणुकांमुळे महापालिकेतील राजकीय समीकरणांनाही वेग आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.