

रायगड जिल्ह्यातील क्रिकेटपटूंसाठी टॅलेंट हंट कार्यक्रम
पोयनाड, ता. १५ (बातमीदार) : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शनिवार २३ व रविवार २४ मे रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चौदा वर्षाखालील उदयोन्मुख मुलांसाठी टॅलेंट हंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील चौदा वर्षाखालील १ सप्टेंबर २०१२ या नंतर जन्मलेल्या वयोगटातील मुलांसाठी एका विशेष क्रिकेट टॅलेंट हंट कार्यक्रमाचे आयोजन प्रथमच रायगड जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी आरडीसीए मार्फत करण्यात आले आहे.
या टॅलेंट हंट कार्यक्रमाला महाराष्ट्र क्रिकेट संघातील स्टार खेळाडू व प्रशिक्षक मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ते खेळाडूंची निवड आणि मार्गदर्शन करणार असून अनुभवी प्रशिक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची ही खेळाडूंना दुर्मिळ संधी असेल. रायगड जिल्ह्यातील चौदा वर्षाखालील जास्तीतजास्ती मुलांनी टॅलेंट हंट कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन आपली नोंदणी दिनांक २१ मे २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करायची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.