

करदात्यांवर सवलतीचा वर्षाव
मिरा-भाईंदर पालिकेचे आवाहन, ३० जूनची मुदत
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा ३० जूनपर्यंत केल्यास मूळ करात पाच टक्के सवलत मिळणार आहे. कराची लवकरात लवकर वसुली व्हावी, यासाठी प्रशासनाने ही सवलत जाहीर केली असून, ३१ जुलैपर्यंत कर भरल्यास तीन टक्के सवलत असणार आहे.
आर्थिक वर्षात महापालिकेने मालमत्ता कराची विक्रमी २५८ कोटी वसुली केली होती. आता नव्या आर्थिक वर्षात ही परंपरा कायम ठेवण्यासाठी करसवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार करदात्यांनी कराचा लवकरात लवकर भरणा करावा यासाठी सवलत दिली जात आहे. ३० जूनपर्यंत कर भरला, तर मूळ करात पाच टक्के व ३१ जुलैपर्यंत कर भरला, तर तीन टक्के सवलत पालिकेकडून देण्यात येणार आहे. या सवलत योजनेला करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ३० जून अखेरीस महापालिकेच्या तिजोरीत ११३ कोटी रुपये जमा झाले होते. या वेळीदेखील देयके मिळाल्यानंतर कराचा भरणा करून लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
--------------------------------
अभय योजनेला पर्याय
पालिका थकबाकीदारांसाठी अभय योजना राबवत होती. वर्षानुवर्षे कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या करदात्यांना थकीत करावर आकारण्यात येत असलेल्या व्याजावर योजनेतून सूट मिळत होती, पण अभय योजनेने प्रामाणिक करदात्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे पालिकेने मुदतीत कर भरणाऱ्यांना सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.