दिलीप प्रभावळकर यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

दिलीप प्रभावळकर यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार
Published on

दिलीप प्रभावळकर यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

वाशी, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई चित्रपट सेना आयोजित ‘सिनेदिशा’ कार्यक्रमात चतुरस्र, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सत्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. बुधवारी (ता. १३) वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना प्रभावळकर यांनी आपल्या दीर्घ अभिनय प्रवासातील आठवणी आणि अनुभव रसिकांसमोर मांडताना अभिनय प्रवासात भेटलेल्या प्रत्येक दिग्दर्शकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
दिग्दर्शकांचे माझ्यावर उपकार आहेत, त्यांनी मला घडवलं, असे म्हणत आपल्या कारकिर्दीतील प्रत्येक टप्प्यावर दिग्दर्शकांनी दिलेल्या संधी आणि मार्गदर्शनामुळेच विविध भूमिका साकारता आल्याचे प्रभावळकर यांनी मान्य केले. या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी प्रभावळकर यांच्या अभिनयातील वैविध्याचे कौतुक केले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात इतक्या वेगवेगळ्या भूमिका करणारे दिलीप प्रभावळकर हे एकमेव कलाकार असतील, असे सांगत त्यांनी प्रभावळकर यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात प्रभावळकर यांच्या कारकिर्दीचा गौरव करताना दिग्दर्शक केदार शिंदे, संजय जाधव, अभिनेते पुष्कर श्रोत्री, अभिजित पानसे, मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांसारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

Marathi News Esakal
www.esakal.com