

विवाहितेच्या आत्महत्येवरून रोष
एल्गार कष्टकरी संघटनेचे धरणे आंदोलन
मोखाडा, ता. १५ (बातमीदार) ः बोटोशीपैकी मरकटवाडी येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे; मात्र तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करीत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेने धरणे आंदोलन केले.
मोखाड्यातील मरकटवाडी येथील शोभा कामडी या विवाहितेने शेतावरच्या घरात १ मे रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे; मात्र सासरच्या लोकांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, अशी मागणी माहेरच्यांनी केली आहे.
------------------
तपासानंतर कारवाई
एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्वात रणरणत्या उन्हात मोखाडा पोलिस ठाण्यासमोर आंदोलकांनी धरणे आंदोलन केले. या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपासानंतर पुढील गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.