मॅट्रिमोनी साईटवर डॉक्टर पती शोधणे महिलेला पडले महागात;

मॅट्रिमोनी साईटवर डॉक्टर पती शोधणे महिलेला पडले महागात;
Published on

मॅट्रिमोनी साईटवर पती शोधणे महिलेला महागात
भामट्याने महिलेची केली २१ लाखांची फसवणूक
पनवेल, ता. १५ (वार्ताहर) : पुनर्विवाहासाठी मॅट्रिमोनी साईटवर जोडीदार शोधणे पनवेलमधील एका ३४ वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले आहे. युनायटेड किंगडममध्ये (यूके) डॉक्टर असल्याचे भासवून एका सायबर भामट्याने लग्नाच्या बहाण्याने या महिलेची तब्बल २१ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला एका खासगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. या महिलेने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यामुळे पुनर्विवाह करण्यासाठी डिव्होर्स मॅट्रिमोनी या वेबसाईटवर आपली प्रोफाईल तयार केली होती. सफ्टेंबर २०२५ मध्ये सायबर भामट्याने समीर पांड्या या नावाने पीडित महिलेसोबत संपर्क साधला व मुळचा गुजरातमधील असून, सध्या युकेमध्ये हृदयरोगतज्ज्ञ असल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर या भामट्याने पीडित महिलेचा विश्वास संपादन करून तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. नोव्हेंबर २०२५ मध्ये पांड्याने महिलेला भेटण्यासाठी मुंबईला येत असल्याचे सांगितले. काही दिवसानंतर दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी असल्याचे भासवून एस. कुमार नावाने दुसऱ्या भामट्याने महिलेशी संपर्क साधला आणि पांड्याने मर्यादेपेक्षा जास्त परकीय चलन आणल्यामुळे त्याला पकडल्याचे सांगून दंड भरल्याशिवाय सोडता येणार नाही, असे सांगितले.
त्यानंतर या भामट्यांनी महिलेला भावनिक सादात अडकवून इंटरनॅशनल टॅक्स सर्टिफिकेट आणि अँटी मनी लॉन्डरिंग सर्टिफिकेटच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले. महिलेने स्वत:च्या चार वेगवेगळ्या बँक खात्यांतून एकूण २१ लाख १४ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्स्फर केले.

असा झाला उलगडा
जानेवारी २०२६ मध्ये महिलेला संशय आल्याने तिने गुगलवरून ब्रिटिश इमिग्रेशनचा हेल्पलाइन नंबर मिळवून चौकशी केली. तपासात समीर पांड्याने दिलेला पासपोर्ट आणि सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोर्टलवर त्यानंतर पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com