तुर्भेमध्ये प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाविरोधात संघर्ष पेटला

तुर्भेमध्ये प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाविरोधात संघर्ष पेटला
Published on

तुर्भेमध्ये प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाविरोधात संघर्ष पेटला
नगरसेवक सुरेश कुलकर्णी १८ मेपासून करणार उपोषण
तुर्भे, ता १५ (बातमीदार) : तुर्भे स्टोअर येथील प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाविरोधात आता संघर्ष अधिक तीव्र झाला असून, वरिष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट १८ मेपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात सुरेश कुलकर्णी यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, तुर्भेकरांच्या जीवाशी खेळणारा हा घातक प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. स्थानिक नागरिक, संस्था आणि मंडळांनी सुरू केलेल्या आंदोलनात ते स्वतः मैदानात उतरून सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
याविरोधात सुरेश कुलकर्णी हे १८ मेपासून तुर्भे स्टोअर येथील शिवसेना शाखा क्रमांक १ जवळ उपोषणास बसणार आहेत. जोपर्यंत हा घातक डब्लूटीई आणि सीबीजी प्रकल्प तसेच संपूर्ण डम्पिंग ग्राऊंड तुर्भे स्टोअरमधून हटवण्याचा लेखी निर्णय होत नाही, तोपर्यंत मी उपोषणावरून उठणार नाही, असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
या आंदोलनाला नगरसेविका संगीता रामचंद्र सांगळे, नगरसेविका अबोली महेश कुलकर्णी, संगीता देविदास लगाडे यांच्यासह स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com