पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विकासकामांना मंजुरी

पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विकासकामांना मंजुरी
Published on

पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विकासकामांना मंजुरी
अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय
पनवेल, ता. १५ (बातमीदार) ः पनवेल महापालिका यांच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी मुख्यालयातील बैठक कक्षात स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत शहर विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आणि पावसाळी तयारीसंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभेस स्थायी समिती सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महेशकुमार मेघमाळे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, शहर अभियंता संजय कटेकर, उपसचिव अक्षय कदम तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सभेत कामोठे सेक्टर-३२ येथील ८५ एमएलडी क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्राच्या परिचालन व देखभालीसाठी सध्याच्या ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली. तसेच कामोठे, नवीन पनवेल, काळुंद्रे आणि इतर सिडको नोडमध्ये नवीन एलईडी पथदिवे बसवण्यालाही हिरवा कंदील देण्यात आला.
प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत रस्ता उन्नतीकरण आणि काँक्रीटीकरण कामातील तृतीय परिमाण बदल व ‘चेंज ऑफ लोकेशन’ प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच कामोठेमधील ओपन नाल्याच्या विकासकामास मंजुरी देण्यात आली.
पालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी आधुनिक लाकूड आधारित नूतनीकरणक्षम ऊर्जेवरील अंत्यसंस्कार प्रणाली स्थापनेच्या दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी भाडेतत्त्वावर पंपपुरवठा, विविध नोडमधील रस्ते दुरुस्ती, तसेच सिडको नोड्स वगळून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सेवा पुरविण्याच्या विषयांनाही मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, २० फिरते स्वच्छतागृह खरेदी, सार्वजनिक शौचालयांचे सुशोभीकरण आणि उद्यानांमध्ये रबर फ्लोरिंग बसविण्याचे विषय स्थगित ठेवण्यात आले. तर ६५ वर्षांवरील सेवानिवृत्त अधिकारी व अभियंत्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. विविध तलावांतील पाण्यावर नैसर्गिक प्रक्रिया करण्यासंदर्भातील निविदा विषय रद्द करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com