स्थानिकांना टोल माफी मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

स्थानिकांना टोल माफी मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
Published on

खारपाडा टोलविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन; स्थानिक वाहनांना टोलमाफी

पेण, ता. १५ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा येथील नव्याने टोलनाका सुरू करण्यात आला आहे. तेथे स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने शुक्रवारी (ता. १५) आंदोलन केले. जवळपास तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर प्रशासन आणि टोल कंपनीसोबत झालेल्या चर्चेनंतर रायगड जिल्ह्यातील एमएच-०६ नोंदणी असलेल्या स्थानिक वाहनांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १८ वर्षांपासून सुरू असून, अनेक ठिकाणी रस्ते, उड्डाणपूल, अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था आणि सेवा रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत टोलवसुली सुरू करण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला.
आंदोलनकर्त्यांनी महामार्गावरील धुळीचे साम्राज्य, अपूर्ण सुविधा, हिंदी भाषेतील फलक आणि वाढत्या अपघातांच्या घटनांकडे लक्ष वेधले. “महामार्गावरील मूलभूत सुविधा पूर्ण करण्याऐवजी टोलवसुलीला प्राधान्य दिले जात आहे,” असा आरोप या वेळी करण्यात आला.
आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रवींद्र इंगोले, टोल कंपनीचे जनरल मॅनेजर नीलेश व्यास, व्यवस्थापक राजेश कुलकर्णी तसेच पनवेल पोलिसांच्या मध्यस्थीने बैठक झाली. या बैठकीत एमएच-०६ नोंदणीकृत स्थानिक वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संबंधित वाहनधारकांनी १५ दिवसांच्या आत आरसी बुक आणि आधार कार्ड सादर करून नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com