

नवी मुंबईतील पहिला बायोगॅस प्रकल्प बंद
देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : दिघा परिसरात मोठ्या उत्साहात उद्घाटन केलेल्या नवी मुंबई महापालिकेचा पहिला बायोगॅस प्रकल्प बंद पडला आहे. देखभाल दुरुस्ती अभावी या केंद्रातील गॅसपुरवठा बंद झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते. दरम्यान, सध्या महागाईच्या काळात हे केंद्र येथील गरीब जनतेला दिलासा देणारे होते. परंतु, आता महापालिकेने या केंद्राच्या देखभाल दुरुस्तीकरिता ठेकेदार नियुक्त करणार आहे.
नवी मुंबईतील चिंचपाडा विभागात दोन वर्षांपूर्वी बायोगॅस विद्युत प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाला पुरवल्या जाणाऱ्या मानवी मलमूत्र आणि दैनंदिन कचऱ्यातून दररोज तब्बल २५० ते ३०० युनिट वीज तयार होणार होती. तसेच, या भागातील सुमारे पाच हजार घरांना गॅसपुरवठा केला जाणार होता. चिंचपाडा प्रभाग क्रमांक सातमध्ये महापालिका आणि स्वर्गीय मीनाताई चौगुले रहिवासी सेवा मंडळ यांच्या माध्यमातून हा सामूहिक बायोगॅस युनिट उभारण्यात आले होते. एमआयडीसीतर्फे पालिकेला मिळालेल्या भूखंडावर हा समाजपयोगी प्रकल्प राबवण्यात आला. नवी मुंबईत प्रथमच अशा प्रकारचा बायोगॅस प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाला एक कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. खासदार निधीतून ७० लाख रुपये व प्रभाग सातचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मदतीने स्वर्गीय मीनाताई चौगुले संस्थेतर्फे ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. उर्वरित खर्च नवी मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आला आहे. या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या विजेपासून पथदिवे चालवण्यात येत होते. तेदेखील बंद पडले आहेत.
देखभाल दुरुस्ती होणार
चिंचपाडा येथील बायोगॅस प्रकल्प बंद पडल्यानंतर आता नवी मुंबई महापालिकेने देखभाल दुरुस्तीचे कंत्राट आणले आहे. प्रति वर्ष एक कोटी २२ लाख या दराने पाच वर्षांकरिता हे काम ठेकेदार कंपनीला देण्यात येणार आहे. युद्धामुळे महागाई भडकली असल्याने स्वयंपाक गॅसचे दर समान्यांना न परवडणारे आहेत. अशा परिस्थितीत या प्रकल्पाची गोरगरिबांना गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.