

आदरांजली - आनंद नाडकर्णी
मनाचा ठाव घेणारा लेखक
मनाचा ठाव घेणारा लेखक अशी आनंद नाडकर्णी यांची ओळख आहे. मानसोपचार आणि मानसशास्त्र या क्षेत्रात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांनी सहज सोप्या भाषेत सामान्यजणांना ‘मन’ ओळखायला शिकवले. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. नाटके लिहिली होती. व्याख्याने दिली. विविध क्षेत्रांत तळमळीने काम करणाऱ्या नाडकर्णी यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले गेलेच; पण रुग्णांसह लाखो लोकांचे अमाप प्रेमही मिळाले.
नाडकर्णी यांच्या १३ पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. वैद्यकसत्ता या पुस्तकाची ५वी आवृत्ती निघाली असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. किंचित पुस्तकाला साहित्य संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण मेमोरियल पुरस्कार, तर ‘गद्यपंचविशी’ला महाराष्ट्र शासनाचा ‘अनंत काणेकर पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. आरोग्याचा अर्थ, एका सायकियाट्रिस्टची डायरी, स्वभाव विभाव, जिज्ञासा, मुक्तिपत्रे, मनोविकास, विषाद योग, देवराईच्या सावलीत, शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट, मनोगती इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली असून, त्यांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या ‘स्वभाव विभाव’ या पुस्तकाचा सतीश बापट यांनी इंग्रजित अनुवाद केला आहे. मुक्तिपत्रे या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद झाला आहे. डॉ. नाडकर्णी यांनी लिहिलेली नाटकेही खूप गाजली. त्यांनी अनेक एकांकिका आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीसाठी तीन संहिता लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘रंग माझा वेगळा’ या नाटकासाठी अभिनेत्री भक्ती बर्वे यांना ‘नाट्य दर्पण पुरस्कार’ मिळाला होता. ‘आम्ही जगतो बेफाम’ या नाटकासाठी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना स्टारर, तर डॉ. नाडकर्णी यांना बी. सी. मर्ढेकर स्मृती पुरस्कार मिळाला होता. ‘तुझ्याविना’ या नाटकाला सात ‘झी’ नामांकने मिळाली होती. हौशी रंगभूमीवरील ‘महासभा’ नाटकासाठी २१व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेत ‘उत्कृष्ट लेखक’ हा पुरस्कार पटकावला होता.
...
चित्रपट, संगीत, माध्यम क्षेत्रात सक्रिय
आनंद नाडकर्णी यांनी ‘स्क्रिझोफेनिया’ आजारावर आधारित पहिल्या भारतीय ‘देवराई’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटासाठी कन्सल्टंट म्हणून काम केले. तसेच अश्विनी भावे निर्मित ‘कदाचित’ चित्रपटासाठी क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून काम केले. त्यांनी मराठी आणि हिंदीत गाणी लिहिली असून, त्यांच्या गाण्यांचे दोन अल्बम प्रकाशित झाले आहेत. ‘नव्या शतकाचे गाणे’ आणि ‘सॉन्ग ऑफ लाईफ’ अशी त्यांची नावे आहेत. ते एका ऑर्केस्ट्रामध्ये गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय होते. त्यांनी विविध मराठी नियतकालिके आणि दिवाळी अंकांत साहित्य आणि मानसिक आरोग्य या विषयावर नियमित लेखन केले आहे. तसेच ते मराठी, इंग्रजी आणि हिंदीतून बोलणारे उत्तम वक्ते होते. ते दरवर्षी सुमारे ३० सार्वजनिक व्याख्याने आणि ३० कॉर्पोरेट सेमिनार घेत असत. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील ४००हून अधिक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या आहेत.
...
मानाचे पुरस्कार
भारत सरकारच्या प्लॅनिंग कमिशनच्या (नियोजन आयोग) सामाजिक कल्याणविषयक सल्लागार समितीवर त्यांची (पंचवार्षिक योजना १९१२-१९१७) नियुक्ती झाली होती. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी ‘इंडियन मर्चंट चेंबर प्लॅटिनम जुबली पुरस्कार’ त्यांना देण्यात आला होता. याशिवाय डॉ. अरुण लिमये स्मृती पुरस्कार, मेडिकल जर्नलिझमसाठी ‘शतायुषी पुरस्कार’ देण्यात आला होता. इंडियन मेडिकल असोसिएशन (मुंबई शाखा) कडून १९९३मध्ये ‘डॉक्टर ऑफ द इयर’ पुरस्कार, औद्योगिक आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी २००१मध्ये ‘गेस्ट लेक्चर पुरस्कार’ देण्यात आला. १९९९मध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार मिळवणारे ते पहिले मानकरी ठरले होते.
...
सर्वांसाठी मानसिक आरोग्य
इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेचे ‘सर्वांसाठी मानसिक आरोग्य’ हे ब्रीदवाक्य आहे. ही भारतातील किंवा आशियातील अशा प्रकारची एकमेव संस्था आहे, जिथे देशविदेशातील मानसिक आरोग्य व्यावसायिक अभ्यासासाठी येतात. येथे ६० प्रशिक्षित व्यावसायिक आणि २५०पेक्षा जास्त स्वयंसेवक काम करतात. ही संस्था कोणत्याही सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय आर्थिक मदतीशिवाय अनुदानित दरात सेवा देते.
...
भूषवलेली पदे
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी नेक संस्थांमध्ये आपले योगदान दिले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र (पुणे) येथे ते संस्थापक विश्वस्त आणि सल्लागार होते. हे केंद्र संयुक्त राष्ट्रांच्या प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र म्हणूनही कार्यरत आहे. स्वयं रिहॅबिलिटेशन ट्रस्ट सेरेब्रल पाल्सी असलेल्या दिव्यांग मुलांसाठीच्या ट्रस्टचे विश्वस्त होते. फार्मा, इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर यासारख्या क्षेत्रांतील ३०पेक्षा जास्त मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये मानसिक आरोग्य आणि मानवी संसाधनांचे एचआर प्रशिक्षण, रेशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपीमधील त्यांच्या अनुभवाद्वारे मानसिक आरोग्य व्यावसायिकांसाठी सर्टिफिकेट कोर्सेस चालवले. याशिवाय त्यांनी गोदरेज अँड बॉयस कंपनीमध्ये कन्सल्टंट, मुक्तिपथ व्यसनमुक्ती केंद्र गडचिरोलीचे सल्लागार, ज्युवेनाईल डायबेटिक फाउंडेशनचे (महाराष्ट्र चॅप्टर) संस्थापक सदस्य, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे व्हिजिटिंग प्रोफेसर, लार्सन अँड टुब्रोमध्ये कन्सल्टंट सायकियाट्रिस्ट इत्यादी पदे त्यांनी भूषवली.
...
व्यावसायिक आवडीची क्षेत्रे
डॉ. नाडकर्णी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ दररोज ११ तास प्रॅक्टिस करत होते. दिवसाला सरासरी ७० ते ८० रुग्णांना ते तपासत असत. बाल आणि किशोरवयीन मुलांचे मानसोपचार, व्यसनमुक्ती आणि कम्युनिटी सायकियाट्रिस्ट, स्पोर्ट्स मेडिसिनचे मानसशास्त्रीय पैलू ही त्यांची आवडीची क्षेत्रे होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.