

खारघर सेक्टर १६ मधील रस्ते व फुटपाथांची दुरवस्था
नागरिकांकडून दुरुस्तीची करण्यासाठी निवेदन
खारघर, ता. १५ (बातमीदार) : खारघर सेक्टर १६ येथील वास्तुविहार परिसरातील रस्ते व फुटपाथांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे, उखडलेले फुटपाथ, फुटपाथवर पडलेले दगड आणि उघडी गटारे यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने सदर समस्या तत्काळ सोडवावी अशी मागणी स्थानिकांनी पालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
खारघर सेक्टर १६ परिसरातील रस्त्याच्या एका बाजूला चारचाकी वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथचाच वापर करावा लागतो. मात्र, फुटपाथवरील गटारांची झाकणे गायब असून, अनेक ठिकाणी फुटपाथ उखडलेले आहेत. त्यामुळे विशेषतः शालेय मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या रस्ते आणि पदपथावरून केपीसी तसेच इतर शाळांच्या बसेसची नियमित वाहतूक सुरू असते. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला असून, यापूर्वीही येथे किरकोळ दुर्घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले. शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाकडे दुर्घटना घडण्यापूर्वी स्त्यांवरील खड्डे बुजविणे, उघड्या गटारांवर झाकणे बसविणे तसेच फुटपाथची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.