मुंबईत तापमान वाढले; झाडांसाठी टँकर पाणीपुरवठ्याची मोहीम

मुंबईत तापमान वाढले; झाडांसाठी टँकर पाणीपुरवठ्याची मोहीम
Published on

मुंबईत तापमान वाढले; झाडांसाठी टँकर पाणीपुरवठ्याची मोहीम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : मुंबईत सार्वजनिक ठिकाणच्या झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाढत्या तापमानाचा वृक्षसंपदेवर प्रतिकूल परिणाम होऊ नये तसेच मुंबईकरांना गारवा मिळावा, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पिण्यासाठी अयोग्य असलेले, परंतु झाडांसाठी पोषक असलेले पाणी यासाठी वापरण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शहरातील सार्वजनिक ठिकाणांतील झाडांना पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर खासगी क्षेत्रातील झाडांसाठी संबंधित गृहनिर्माण संस्थांनी पाणीपुरवठा करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. अतिउष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि झाडांवर ताण वाढतो. परिणामी, झाडांची मुळे कमकुवत होऊन जमिनीवरील पकड सैल पडण्याची शक्यता वाढते. तसेच झाडांच्या फांद्या कोरड्या व ठिसूळ होऊन तुटण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे झाडांना नियमित पाणी देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रस्ते स्वच्छता मोहिमेदरम्यान झाडांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जी दक्षिण विभागात केशवराव खाड्ये मार्ग तसेच सांताक्रुझ व जुहू परिसरात स्वच्छता अभियानासोबत झाडांना पाणी देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.
----------------
झाडांना पाणी घालण्याचे आवाहन
उद्यान विभागाकडूनही मुंबईतील विविध भागांत झाडांची निगा राखणे, आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा करणे तसेच झाडांच्या आरोग्याची पाहणी करणे, ही कामे सातत्याने सुरू आहेत. उन्हाळ्यात झाडांचे जतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या परिसरातील तसेच गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील झाडांना वेळोवेळी पाणी घालावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com