तीन अवजड वाहने एकमेकांवर आदळली मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; दोन ठार, दोन जखमी

तीन अवजड वाहने एकमेकांवर आदळली
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; दोन ठार, दोन जखमी
Published on

तीन अवजड वाहने एकमेकांवर आदळली
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात; दोन ठार, दोन जखमी

खालापूर, ता. १५ (बातमीदार) : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाट परिसरात शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. खोपोली बायपासजवळ तीन अवजड वाहनांची एकमेकांना धडक झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ऑइल पेंटचे डबे रस्त्यावर विखुरल्याने आणि रंग सांडल्याने द्रुतगती मार्गावर आणि मिसिंग लिंकवर तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

अपघातात ऑइल पेंट वाहून नेणाऱ्या ट्रकमधील चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. दुसऱ्या ट्रकचा चालक तसेच कंटेनरचालक जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑइल पेंटचे डबे वाहून नेणारा ट्रक सायंकाळी ६च्या सुमारास बोरघाटातील तीव्र उतारावरून मुंबईच्या दिशेने जात होता. खोपोली हद्दीत मिसिंग लिंक प्रकल्पाच्या अलीकडे ट्रकचा वेग अचानक वाढला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे असलेल्या कंटेनरवर जोरात आदळला. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येणारा आणखी एक ट्रक या दोन वाहनांवर धडकला आणि क्षणार्धात तिन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला. या धडकेनंतर ऑइल पेंट वाहतूक करणारा ट्रक रस्त्यात पलटी झाला. ट्रकमधील शेकडो पेंटचे डबे महामार्गावर विखुरले गेले. अनेक डबे फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रंग सांडला. त्यामुळे काही काळ संपूर्ण महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती.

एक तास वाहतूक संथ गतीने
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलिस, खोपोली पोलिस, आयआरबीची यंत्रणा तसेच हेल्प फाउंडेशनचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबविण्यात आले. रस्त्यावर सांडलेला रंग आणि वाहनांचे अवशेष हटविण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला करण्यात आली. जवळपास एक तास वाहतूक संथ गतीने सुरू होती. नंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. प्राथमिक तपासात ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास बोरघाट महामार्ग पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com