

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेत योग दिन साजरा
खारघर, ता. २२ (बातमीदार) : खारघर येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विशेष योग दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नवी मुंबई येथील योग विद्या निकेतन संस्थेच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेतील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि कर्मचारी यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. योग विद्या निकेतनचे प्रमुख दीप वर्मा यांच्या नेतृत्वाखाली योगिता ढमढेरे, सिजी मुरली, नमिता बोडके, विक्रांत आणि सीमा या योग शिक्षकांनी विविध योगासने, श्वसनाचे व्यायाम आणि शिथिलीकरण तंत्रांचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.