विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेला ३० जून पासून पनवेल तालुक्यात सुरुवात

विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेला ३० जून पासून पनवेल तालुक्यात सुरुवात
Published on

पनवेलमध्ये मतदार यादी पुनरावलोकन मोहीम ३० जूनपासून
पनवेल, ता. २३ (बातमीदार) ः विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन कार्यक्रम पनवेल तालुक्यात ३० जूनपासून सुरू होणार आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. याच्या पूर्वतयारीसाठी नुकतीच फडके नाट्यगृहात अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मतदार नोंदणी अधिकारी पवन चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली.
या बैठकिस सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी मिनल भामरे, नानासाहेब कामठे, रमेश चव्हाण, संभाजी शेलार, समीर वाठारकर, रविकिरण घोडके, उपायुक्त स्वरूप खारगे, उपायुक्त अभिषेक पराडकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळणी करणार आहेत. या भेटीदरम्यान मतदारांना नाव, पत्ता, छायाचित्र तसेच इतर तपशीलांमध्ये आवश्यक बदल नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही मतदार यादी ऑगस्टमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना दावे व हरकती नोंदविण्याची संधी दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com