तानाजी मालुसरे मैदानाची दुरावस्था

तानाजी मालुसरे मैदानाची दुरावस्था
Published on

नेरूळमधील सेक्टर सहामधील उद्यानाला समस्यांचे ग्रहण
आयुक्तांनी पाहणी करण्याची मागणी
नेरूळ, ता. २२ (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर ६ येथील राजमाता जिजाऊ गार्डन व तानाजी मालुसरे मैदान यांची दुरवस्था झाली असून, प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. उद्यानातील विविध समस्यांमुळे येथे येणाऱ्या बालकांच्या, महिलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा तसेच आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
गटरावरील तुटलेली झाकणे, उंदरांचा सुळसुळाट, मोडकळीस आलेले प्रवेशद्वार, तुटलेले झोपाळे, खराब झालेली बसण्याची व्यवस्था, खाली पडलेले कचराकुंडीचे डबे तसेच परिसरात साचलेला कचरा असतो. या उद्यान व मैदानाचा दररोज लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक वापर करतात. मात्र, सुविधांची झालेली दुरवस्था पाहता संबंधित विभागाचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दुरुस्ती व स्वच्छतेचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com