सिवूड्स स्थानकात मॉलमधील ट्रॉली गाड्यांमुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात

सिवूड्स स्थानकात मॉलमधील ट्रॉली गाड्यांमुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात
Published on

सिवूड्स स्थानकात सुरक्षा धोक्यात
मॉलमधील ट्रॉली गाड्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
बेलापूर, ता. २२ (बातमीदार) ः सिवूड्स रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेचे साम्राज्य कायम असताना, आता प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. स्थानक परिसराला लागूनच असलेल्या एका मॉलमध्ये खरेदीसाठी येणारे नागरिक सामानाच्या ट्रॉली रेल्वे स्थानकात आणि थेट फलाटावर (प्लॅटफॉर्मवर) आणत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे एखादी ट्रॉली अचानक रेल्वे रुळात पडली, तर मोठा रेल्वे अपघात होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. यामुळे रेल्वे प्रशासन, सिडको प्रशासन यांनी तत्काळ या ट्रॉली गाड्यांना स्थानकात, फलाटावर येण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील महत्त्वाच्या अशा सिवूड्स स्थानकात हजारो प्रवाशांची वर्दळ असते. अशातच स्थानक परिसराशेजारी मॉलमध्ये प्रतिदिन हजारो नागरिक फिरण्यासाठी, खरेदीसाठी येतात. मात्र, खरेदीनंतर बहुतांश नागरिकांकडून सामानाच्या ट्रॉली गाड्या चक्क स्थानकातील सबवे, प्लॅटफॉर्मवर आणल्या जातात. अनेक वेळा या गाड्या तशाच प्लॅटफॉर्मवर पडून असतात. सुरक्षा रक्षकही याबाबत कोणतीही काळजी घेत नसल्याने भविष्यात ही ट्रॉली रेल्वे रुळावर पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सिडको सुरक्षा रक्षक, रेल्वे पोलिस, रेल्वे प्रशासन यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

स्थानकाची सुरक्षा धोक्यात
गेल्या काही दिवसांपासून या स्थानकावर बेघर, भिकारी, गर्दुल्ले यांचा वावर वाढला आहे. त्यातच अत्यंत कमी संख्येने तैनात असलेल्या सिडको सुरक्षा रक्षकांमुळे स्थानकाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

ट्रॉली गाड्या अनेक वेळा प्लॅटफॉर्मवर आणण्यात येतात. आमच्या लक्षात आल्यावर आम्ही तत्काळ त्या गाड्या हटवतो. मात्र, याबाबत भविष्यात सिडको सुरक्षा रक्षक, रेल्वे पोलिस यांनीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे. स्थानक परिसरात, प्लॅटफॉर्मवर ट्रॉली गाड्या येणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल.
- अमृत सळसकर, स्थानक प्रबंधक, सिवूड्स स्थानक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com