फार्मर कपला कर्जतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

फार्मर कपला कर्जतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

फार्मर कपला कर्जतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
स्पर्धेत ६७ शेतकरी गटांचा सहभाग; गटशेतीला चालना
कर्जत, ता. २२ (बातमीदार) : पानी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेला कर्जत तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ६७ शेतकरी गटांनी सहभाग नोंदवला आहे.
अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या पानी फाउंडेशनने २०२२ पासून सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश गटशेतीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि शेती अधिक फायदेशीर करणे हा आहे. प्रत्येक गटात किमान ११ शेतकरी सहभागी असून, सामूहिक शेती, नियोजन आणि विपणनावर भर दिला जात आहे.
भातपिकाच्या उत्पादनवाढीसाठी माती परीक्षण, सेंद्रिय खतांचा वापर, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. महिला शेतकरी गटांचाही सक्रिय सहभाग असून, त्यांना निर्णय प्रक्रियेत प्राधान्य दिले जात आहे. राज्य स्तरावर ५०, ३० व २० लाख, तर रायगड जिल्हा स्तरावर ५, ३ व २ लाख रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com