

बोर्डी, ता. २२ (बातमीदार) : पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, पावसाचा पत्ता नसल्यामुळे खरीप हंगाम पुढे ढकलला जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सोमवारी (ता. २२) सकाळी पाऊस पडेल, अशी वातावरणनिर्मिती झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु थोड्याच वेळात पावसाने काढता पाय घेतल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. या भागात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील भातशेती व बांधावरील पिकाची लागवड केली जाते. या अनुषंगाने शेतकरी खरीप हंगामातील शेतीसाठी सज्ज झाला आहे. बियाणे, खतखरेदी तसेच फवारणीसाठी लागणारे रासायनिक व जैविक औषधांचा साठा आदी वस्तू खरेदी करून बळीराजा पावसाची प्रतीक्षा करीत असतानाच सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पश्चिम किनारपट्टीवरून काळे ढग भरून आले होते. दरम्यान, ढगांच्या गडगडातदेखील सुरू झाला. थोड्या वेळातच पाऊस पडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. दहा-साडेदहा वाजता हलक्या स्वरूपात रिमझिम पाऊस सुरू झाला; मात्र, थोड्या वेळातच पावसाने काढता पाय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.