

पनवेलमध्ये ७५ बेडच्या बेघर निवारा प्रकल्पाची पाहणी
लोकप्रतिनिधींकडून बांधकामाचा आढावा
पनवेल, ता. २२ (बातमीदार) : पनवेल महापालिकेतर्फे सेक्टर-१२ येथील प्लॉट क्रमांक २ए वर उभारण्यात येत असलेल्या बेघर निवारा प्रकल्पाची शुक्रवारी स्थायी समिती सदस्य परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पाहणी करण्यात आली. या वेळी महापालिका सदस्य सीताताई पाटील, दशरथ म्हात्रे, कुसूम गणेश पाटील तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.
शहरातील बेघर, निराधार आणि गरजू नागरिकांना सुरक्षित व सन्मानजनक निवारा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात आहे. पाहणीदरम्यान लोकप्रतिनिधींनी बांधकामाची प्रगती, उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला.
या प्रकल्पात एकूण ७५ बेडची व्यवस्था करण्यात येणार असून कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र मजल्यांवर निवासाची सुविधा असेल. याशिवाय स्वयंपाकघर, स्टोअर रूम, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, लिफ्ट आणि पाणी साठवणुकीसाठी स्वतंत्र टाक्यांची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
स्थायी समिती सदस्य परेश ठाकूर यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना बांधकामाचा दर्जा कायम राखत प्रकल्प नियोजित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत निवारा केंद्र अधिक स्वच्छ, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महापालिका सदस्यांनीही प्रकल्पाच्या विविध बाबींची माहिती घेत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.