

सिडकोचे नवे एमडी मुदगल यांच्यामुळे विकासाचा वेग वाढणार
काँग्रेस नेते महेंद्र घरत यांनी दिल्या शुभेच्छा
उलवे, ता. २२ ः सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्र घरत यांनी सोमवारी (ता. २२) सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी मुदगल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सिडको क्षेत्रातील विविध प्रलंबित विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
अश्विन मुदगल यांची अतिशय कार्यतत्पर अधिकारी अशी ओळख आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या समस्या मार्गी लागतील, असा आशावाद महेंद्र घरत यांना आहे. अश्विन मुदगल यांना सुमारे १८ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे. यापूर्वी त्यांनी सिडकोत सहव्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे सिडकोचा गाढा अभ्यास अश्विन मुदगल यांना आहे. त्याचा फायदा सिडकोचे रखडलेले आणि नवीन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी होईल, असाही आशावादही महेंद्र घरत यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.